सरपंच पदाचे आरक्षण सोडत आता 29 जानेवारी 2021 रोजी दुपारी 02.00 वाजतापासून कन्नमवार सभागृह,मूल येथे

36

मूल :—  15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर मुल तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सन 2021 ते 2025 या कालावधीकरीता सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 (सरपंच,उपसरपंच) निवडणुक नियम,1964 चे नियम 2 अ ( 3) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत निहाय निश्चीत करावयाचे आहे.
त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे पत्र क्र साशा/कार्य—1 2/ट —1 निवड/2021/161 व 162 दिनांक 25/01/2021 नुसार

मूल  तालुक्यातील 49 ग्रामपंचायत पैकी

अनुसूचीत जाती करीता 3 जागा

अनुसूचीत जाती महिला करीता 3 जागा

तसेच अनुसूचीत जमाती करीता 5 जागा

अनुसुचीत जमाती महिला करीता 4 जागा

आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता 6 जागा व

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता 7

जागा निश्चीत करण्यात आल्या असून याशिवाय

खुला प्रवर्ग करीता 10 जागा व

खुला प्रवर्ग महिला करीता 11 जागा आरक्षित राहणार आहेत.

त्यानुसार वरनमूद नुसार जागानिहाय आरक्षणाची सोडत दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी दुपारी 02.00 वाजतापासून कन्नमवार सभागृह,मूल येथे काढण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य,विविध पदाधिकारी व तालूक्यातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
तहसिलदार मुल यांचे व्दारे करण्यात येत आहे.