चंद्रपूर – युवासेनेचा कौतुकास्पद उपक्रम, गरजूंना इ-रिक्षाचे वाटप

42

युवासेनेने अत्यंत कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अवचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा समनव्य विक्रांत सहारे यांनी शहरातील दुर्गापूर मधील नेहा नगरमधील गरजू अशोक कापघाते यांना त्यांच्या घरी जावून इ रिक्षा दिली. यावेळी युवासेना जिल्हा समनव्य विक्रांत सहारे सह पवन नगराळे अशोक चिरखरे, कमलाकर कुळमेते, महेश मेश्राम शिवसैनिक उपस्थित होते.

युवासेना जिल्हा समन्वय विक्रांत सहारे यांनी गरजूंना इ-रिक्षा वाटण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत अशोक कापघाते यांना इ-रिक्षा देण्यात आली. यावेळी गरजूंनी शिवसेना कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले.