मूल येथे संगणक परिचालकांचे आंदोलन

36

मूल येथे आपले सरकार सेवा केंन्द्र प्रकल्पा संबंधात
संगणक परिचालकांचे आंदोलन

मूल :— सर्व संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सोमवारी मूल तालुक्यातील संगणक परिचालकांनी पंचायत समिती समोर निषेध आंदोलन केले.
निवेदनानुसार,शासनाने 14 जानेवारी रोजी संगणक परिचालकांवर अन्याय करणारे दोन शासननिर्णय निर्गमित केले.त्यानुसार संगणक परिचालकांना पूर्वी असलेल्या सहा हजार मानधनात एक हजार रूपयांची वाढ करण्यात आले.त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये मोठा असंतोष आहे.त्या दोन्ही शासननिर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी मूल पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालकांनी काळया फिती लावून निषेध आंदोलन केले.त्या शासन निर्णयाची होळी केली. यात मूल तालुक्यातील ग्रामपंचायत आपले सरकार परिचालक उपस्थित होते.

मूल पंचायत समिती समोर  एकत्र आलेले संगणक परिचालक