बंधा—याचे अतिरिक्त पाणी गावतलावात सोडण्याची मागणी – टेकाडी ग्रामस्थानी केली आहे.

46

बॅरेजचे पाणी गावतलावात सोडा
मूल :— शेतक—यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मूल तालुक्यातील टेकाडी गावाजवळ नदीवर बॅरेज बंधा—याचे बांधकाम करण्यात आले. या बंधा—याचे अतिरिक्त पाणी गावतलावात सोडण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
लाखो रूपये खर्चून बांधण्यांत आलेल्या या बंधा—याची अलीकडेच राज्याच्या मृदु व जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचे अतिरीक्त मुख्य सचिव डी.नंदकुमार यांनी पाहणी केली. यावेळी रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनू गोयल,प्रादेशिक जलसंधारण अधिकारी एन.डी.सहारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी टेकाडी येथील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य सतिश चौधरी, शंकर सिडाम,किरण चौधरी,लिना गोवर्धन,अमित घडसे यांच्या नेतृत्वात शेतक—यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांची भेट घेऊन नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेज बंधा—यातून अतिरिक्त वाहून जाणारे पाणी गाव तलावात सोडण्याची व्यवस्था केल्यास तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढून त्याचा लाभ शेतक—यांना वेगवेगळे पीक घेण्यात हेाईल,असे निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांची मागणी रास्त असून अतिरिक्त वाहून जाणा—या पाण्याचे योग्य नियोजन होणे महत्वाचे असल्याने यासंबंधी प्रयत्न करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.