सोमनाथ येथे वृद्धांचा खून

34
मूल :-
येथून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध सोमनाथ येथे एका कुष्ठरोगी वृद्धाचा खून झाल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
सोमनाथ प्रकल्प येथील नारायण निकोडे  (७५) रा हा दि. ६/९/०८ पासुन सोमनाथ कूष्टरोगी  सेवा समिती मध्ये भरती होता. तो मूळचा गेवरा तहसील सावली येथील रहिवासी होता.  फाल येरिया मध्ये चौकीदार म्हणून शेतावर देखरेख करण्याचे काम करीत होता.  तो दि. २०/१/२१ सायंकाळ पासून बेपत्ता होता अशी तक्रार मुल पोलिस स्टेशन ला मिळाली होती. दि. २१/१/२१ ला सकाळ पासुन मुल पोलिस स्टेशन चे कर्मचारी तथा वन विभागचे कर्मचारी यांनी संयुक्त रित्या शोध मोहीम राबवित  जंगलात  शोध  घेतला असता त्याचा राहत्या घराचा  मागील  भागात  बंधाराच्या पाण्यात  त्याचे  प्रेत दुपारी २.०० वाजताच्या  दरम्यान  दिसले.  त्यांचा  शरिरावर व पोटावर  टोकदार व  धारदार हत्याराने भोसकल्याची जखम होती व  पाठी मागील बाजुुला   देखिल  मोठी  जखम  होती. या वरुन  त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट होते.  त्या वरुन  अज्ञात आरोपि विरुध्द भा.द.वी. ३०२ अन्वये गुन्हा  दाखल  करूून पुढील  तपास उप-विभागीय पोलिस अधिकारी  अनुज तारे  यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत, साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज गदादे करीत आहे.