दिव्यांगांना मिळणार सर्व सुविधायुक्त युनिक कार्ड सर्व शासकीय योजनांचा फायदा स्वावलंबन कार्ड व्दारे मिळणार

80

 

मूल (प्रमोद मशाखेत्री ) :— दिव्यांगांना केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांना ‘एक कार्ड—अनेक सुविधा’ याअंतर्गत अनेक सुविधायुक्त युनिक आयडी कार्ड मिळणार आहे. हे कार्ड देशात कोठेही चालणार आहे. सर्व सवलतीसाठी त्याचा वापर होणार आहे.

👉🏻कागदपत्रे
१) अपंग प्रमाणपत्र (Online) √
२) आधार कार्ड √
३) सही किंवा अंगठा √
४) फोटो

        दिव्यांगांना हे आॅनलाईन युनिक आयडी कार्ड मिळणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने सुरू झालेल्या या उपक्रमातील कार्डला दिव्यांग युनिक आयडी कार्ड,स्वावलंबन कार्ड,वैश्विक कार्ड अशी तीन नावे देण्यात आली आहेत.या आयडी कार्डच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. दिव्यांगांना एस.टी,रेल्वे,विमान,व इतर सर्व शासकीय योजनांचा फायदा युनिक कार्डव्दारे नक्कीच मिळणार आहे.
‘कार्ड एक—फायदे अनेक’ हे रंगीत कार्ड आधार कार्ड प्रमाणे देशात एकच असणार आहे. आधार कार्ड युनीक कार्डशी लिंक असेल.फोटोसह पूर्ण नाव,पत्ता,दिव्यांग प्रकार /टक्केवारी मोबाईल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे. दिव्यंाग युनिकआयडी कार्डवर क्युअर कोड असणार आहे. दिव्यांगांना तो कोड स्कॅन करून आपली माहिती तपासून घेता येईल. त्यामुळे हे कार्ड म्हणजे दिव्यांगांसाठी एक महत्वाचा ऐवज ठरणार आहे.केंन्द्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.आमच्या कडे घरबसल्या युनिक कार्डसाठी
सवलतीमध्ये आॅनलाईन नावनोंदणी सुरू आहे.तसेच युनिक आयडी ई—कार्ड आणि ई—प्रमाणपत्र काढून देत असून दिव्यांगांना युनिक फॉर्म अपलोड करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहे. आता दिव्यांगांना युनिक ओळखपत्रासाठी अनेक कार्यालयांची उंबरठे झिजविण्यासाठी गरज पडणार नाही. दिव्यांगांना वेगवेगळया योजनांसाठी वेगवेगळया कार्डाची आवश्यकता लागत होती. यामध्ये एस.टी पास,रेल्वेपास,आदी ठिकाणी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्र दाखवण्याची गरज पडत होती.
युनिक कार्ड हे दिव्यांगांचे 21 प्रकारचे प्रमाणही दर्शविणार आहे. आॅनलाईन युनिक आयडी कार्ड फॉर्म भरल्यानंतर जिल्हा सिव्हिल हॉस्पीटल येथे दिव्यांगांनी भरलेला फॉर्म आणि पावती दाखवून केंद्र शासनाचे आॅनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र पोच घ्यावयाचे आहे. तसेच केंद्रशासन यांच्या कामकाजानुसार आपणाला ओरिजनल युनिक कार्ड पोस्टाव्दारे घरपोच मिळेल.कोणत्याही शासकीय योजनेची घाई करू नये.हे युनिक कार्ड नक्कीच मिळेल, याची दिव्यांगांनी नोंद घ्यावी.युनिक कार्डवर दिव्यांगांना संपूर्ण देशात कोठेही लाभ घेता येणार आहे.