शिधापत्रिकेसोबत आधार लिंक आवश्यक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत

44

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेसोबत मोबाइल व आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. वितरण प्रणालीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने शिधापत्रिकेसोबत आधार कार्डची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभर शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आधार कार्डची अद्यापही नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकाननिहाय यादी तयार करून त्यांच्या मार्फतीने ई-पास उपकरणातील ई-केवायसी व मोबाइल क्रमांक जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

३१ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी न केल्यास लाभार्थ्यांना आधार कार्डची नोंदणी होईपर्यंत अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार .