लहान विक्रेत्याना केवळ फुटपाथचाच आधार —अरूण खोब्रागडे अध्यक्ष श्रमीक बहुउदेशिय संघटना मूल

45

पथविक्रेत्यांना ओळखपत्र व शासनाच्या संकेतस्थळावर सर्वेक्षण यादी प्रकाशित करण्यात यावी
लहान विक्रेत्याना केवळ फुटपाथचाच आधार —अरूण खोब्रागडे अध्यक्ष श्रमीक बहुउदेशिय संघटना
मूल :— शहराची ओळख सुदंर शहर उद्योगनगरी म्हणून असली तरी चुकीच्या विकास धोरणामुळे अनेक लघु व सूक्ष्म उद्योग डबघाईस आले. कोरोना लॉकडाऊन ने त्यात पुन्हा भर टाकली. अनेकांचे रोजगार बुडाले. खासगी नोक—या गेल्या अशा कठीण परिस्थितीत प्रपंच कसा चालवावा,असा प्रश्न निर्माण झाला. या अवस्थेतून पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी रस्तावरील फुटपाथवर दुकाने मांडली.नगरपरिषदने कारवाई केली तर दुकाने उचलतात. मात्र, दुस—या दिवशी पुन्हा फुटपाथवर येतात. प्रस्तावित हॉकर्स झोनचा दिवस मागील अनेक वर्षापासून उजाडला नाही.
नगरपरीषदने रस्तावरील फुटपाथवर विक्रेत्यांनी आॅनलाईन नोंदणी करून हॉकर्स झोन केला नाही.नगरपरीषदेने विक्रेत्यंाना ओळखपत्र दिले नाही. योजनांव्दारे अनुदान दिले नाही. काहींनी बॅंकांतून कर्ज काढले.त्यामुळे फुटपाथ हाच त्याचा आधार झाला आहे.

पथविक्रेत्यांना आर्थिक मुदत करण्याच्या उदेशाने केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (​स्वनिधी)योजना सुरू करण्यात आली होती परंतु मुल शहरातील पथविक्रेत्यंाना या योजनेचा लाभ काही पथविक्रेत्यांना मिळाला नसल्याचा आरोप अरूण खोब्रागडे यांनी केला आहे.
सदर योजनेअतग्रत पथविक्रेत्यांना कर्ज वितरत करण्यात यावे असा निवेदन मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.