सदस्यांना लागले आता सरपंचपदाच्या सोडतीचे डोहाळे.मुल तालुक्यातील 37ग्रामपंचायतींना सरपंचाची प्रतीक्षा

43

सदस्यांना लागले आता सरपंचपदाच्या सोडतीचे डोहाळे
आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष : मुल तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींना सरपंचाची प्रतीक्षा
मूल (प्रमोद मशाखेत्री ) : तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीसाठी नुकतीच निवडणूक पार पाडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र,सरपंच पदाचे आरक्षण अद्यापही जाहीर झालेले नाही. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावाचा प्रमूख गावकारभारी कोण ? हे ठरणार आहे.त्यामुळे आता निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना सरपंच पदाचे डोहाळे लागले आहेत.
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणा—या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहे. यात 35 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच प्रमूख राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. मात्र,या पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतीची संख्या आणि निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपैकी कितीतरी जास्त आहे.त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतीवर निवडणुकीचे हे केवळ दावेच आहेत.ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित लढविली जाते. गावपातळीवर निवडणूक ल​ढविली जात असल्याने यात सर्वच पक्ष बाहेरून पाठिंबा देतात.
त्यामुळे निवडणुकीनंतर राजकिय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर झेंडा रोवल्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात कोणाची किती ग्रामपंचायतीवर सत्ता आली, हे चित्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होऊन प्रत्यक्षात सरपंच आरूढ झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे.