हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा.

89

हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा.
मूल :— जिजाऊ ब्रिगट महिला बचत गट तर्फे रविवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, एकल नृत्य, समूह नृत्य महिलांनी तसेच मुलींनी साजरे केले.कुणबी मोहला वार्ड नं. 5 येथिल महिलांनी उत्साह दाखवित हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.

या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूल नगर परिषदेच्या अध्यक्षा रत्नमाला भोयर होते. उदघाटक मूल नगर परिषदेच्या नगरसेविका प्रभाताई चौथाले, प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी वाघरे, विद्या बोबाटे, कोटगले, सुधा चरडुके , नरुले ताई , कोरडे, माया चौकुंडे, शोभाबाई चिताडे, पुष्पा चिताडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन जया भुरसे तर आभार स्नेहा भुरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगट महिला बचत गट तसेच महिलांनी प्रयत्न केले. यावेळी कुणबी समाजाच्या महिला, युवती मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी महिलांची उपस्थिती राहिली.