आठ महिन्यांनंतर ग्रामसभा स्थगिती उठविली,ग्रामविकास विभागाचे आदेश

44

आठ महिन्यांनंतर ग्रामसभा स्थगिती उठविली,ग्रामविकास विभागाचे आदेश
मूल :— कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश,अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या ग्रामसभाही स्थगित करण्यात आल्या होत्या. अशातच आता 15 जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामसभावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3)च्या कलम 7 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
अशातच कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी केंन्द्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासनादेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक,राजकीय सभावर बंदी घालण्यात आली होती सदर आदेश व कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेत असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुर्भावाच्या दुष्टीने योग्य नाही नसल्याची बाब विचारात घेऊन शासनाने ग्रामसभा घेण्यास तात्पुर्ती स्थगिती दिली होती सध्याच्या स्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधात शिथिलता येत असून बहूतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास दिलेली स्थगिती उठविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती. त्यानुसार आता कोविडच्या लॉकडाऊनमधील स्थिती पूर्वपदावर येत असल्याने ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र,या ग्रामसभा घेताना फिजिकल डिस्टन्स,तसेचकोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे कोटकोर पालन करून ग्रामसभांना परवानगी देण्यात आल्याने आता पूर्वीप्रमाणेच ग्रामसभा पार पडणार आहेत.