ग्रामपंचायत निवडणूकीत उत्साहाने मतदान

41
ग्रामपंचायत निवडणूकीत उत्साहाने मतदान
दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.90 टक्के मतदान
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीकरीता आज झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सकाळपासूनच उत्साहाने भाग घेवून आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 64.90 टक्के सरासरी मतदान झाले होते. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशीरा प्राप्त होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीसाठी 4 लाख 10 हजार 105 स्त्री मतदार तर 4 लाख 35 हजार 164 पुरुष मतदार आणि 1 इतर असे एकूण 8 लक्ष 45 हजार 270 मतदार आहेत.
आज झालेल्या निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 2 लाख 86 हजार 61 स्त्री मतदार, 2 लाख 62 हजार 482 पुरुष मतदार असे एकूण 5 लाख 48 हजार 543 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी 64.90 आहे. अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मतदानाची स्थिती स्पष्ट होणार आहे.
ताडोबा जवळ मोहर्ली गावातील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्याचे शाईचे निशान दाखवताना गावातील महिला.