आधुनिक युगात युवापिढीने स्वामी विवेकानंदांचा आदर्श जोपासावा :सुरेश अहिरकर

61

आधुनिक युगात युवापिढीने स्वामी विवेकानंदांचा आदर्श जोपासावा :सुरेश अहिरकर
मूल :— तरूणांनी आपल्या जीवनात विज्ञानवादी दुष्टिाकोन स्वीकारून ध्येय प्राप्त करावे. त्यासाठी कठोर परिश्रम करून यश संपादन करावे. समाजविघातक कार्य न करता मदतीसाठी तत्पर असावे. स्वामी विवेकानंदांचे मौलिक विचार आधुनिक युगात युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्या विचारांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी. असे मत रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ बेंबाळचे अध्यक्ष सुरेश अहिरकर यांनी व्यक्त केले.

विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाउु जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमूख अतिथी म्हणून रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नथूराव आरेकर,प्रभारी प्राचार्य कमल हिरादेवे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. नथुराव आरेकर यांनी राजमाता जिजाउु यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कमल हिरादेवे यांनी,स्वामी विवेकानंदाच्या कार्याची महती विशद करून मानवी जीवनात कितीही अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवून यशस्वी व्हावे,असे मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा.सोनाली उमक,संचालन प्रा.रामटेके तर आभार प्रदर्शन प्रा.देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रतापगिरीवार,प्रा.सोनुले.प्रा.भसारकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी राजेश पाल,प्रीती वाढई यांचे सहकार्य लाभले.