35 ग्रामपंचायत 274 सदस्यपदांसाठी चुरशीची लढत आज मतदान,51 हजार 677 मतदार बजावणार हक्क

45

35 ग्रामपंचायत 274 सदस्यपदांसाठी चुरशीची लढत
आज मतदान,51 हजार 677 मतदार बजावणार हक्क

मूल (प्रमोद मशाखेत्री ):— तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार 109 केेंन्द्रावर मतदान होत आहे.यात 274 सदस्यपंदासाठी चुरस आहेत.693 उमेदवार रिंगणात असून 51 हजार 677 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या प्रक्रियेत मनुष्यबळ राहणार आहेत.मात्र कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर आवश्यक ती सर्व जबाबदारी प्रशासनव्दारा घेतली जात आहे. निवडणुकीसाठी तालुक्यांची निवडणूक यंत्रना सज्ज आहे.

सरंपच पदाचे आरक्षण पूर्वीच जाहीर न झाल्याने सरपंचदाची माळ आपल्या गळयात पडावी,यासाठी आपला गट निवडून यावा,यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. शासन विविध कामांसाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देत असल्याने या निवडणूकीत चुरस वाढली आहे. या निवडणूकीत प्रामुख्याने भाजपा, कॉंग्रेस या पक्षात चुरस असली तरी शिवसेना, बसपा,वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
गावगाडयातील राजकारण शहरापेक्षा वेगळे असल्याने वातावरण केव्हा तापेल,याचा नेम नाही यासाठी तालुका प्रशासन 35 गावात पोलीस यंत्रणेसह विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती तालुका निवडणूक विभागाने दिली.