मूल ताडाला मार्गावार भीषण अपघात दोन ठार, तीन गंभीर

34

 

मूल :-

मूल ताडाळा मार्गांवर महाबीज प्रक्रिया केंद्रापासून जवळच आज दिनांक 12 जानेवारीला सकाळी 11 वाजताचे दरम्यान होंडा पॅशन क्रमांक एम एच 34 ए एफ 45 37 या दुचाकीने चक दुगाळा येथे जात असलेले स्वप्निल गुज्जनवार आणि लोबान रामटेके तर विरुद्ध दिशेने गडीसुरला वरून होंडा सीडी 110, एम एच 34 बी 97 11 या दुचाकीने येत असलेले अनिल झरकर, चंद्रशेखर निकुरे, रवींद्र कावळे यांची समोरासमोर धडक झाल्याने 28 वर्षीय स्वप्निल गुज्जनवार रामपूर येथील रहिवासी जागीच ठार झाला दोन दुचाकी ने समोरासमोर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी असून जखमींना मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

मृतकांची नावे स्वप्नील गुज्जनवार वय 28 राहणार रामपूर(मूल), जितेद्र कावळे राहणार गडीसुर्ला अशी आहेत . तर अनिल हरिश्चंद्र झरकर राहणार चक्क फुटाणा ता. पोंभुर्णा, चंद्रशेखर निकुरे राहणार गडीसुर्ला ता. मूल, लोभान रामटेके राहणार केळझर ता. मूल यांना चंद्रपूर येथिल जिल्हा रुग्णालयात उपचारा करिता रेफर करण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन मूल चे ठाणेदार सतिससिंह राजपूत करीत आहेत.