१२ जानेवारी रोजी वन व कृषी पर्यटन शिबीराचे आयोजन

38

मूल :-  संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण व्हावे व कृषी पर्यटनाला चालना मिळावी याशिवाय जैवविविधतेचे संरक्षण व व्यवस्थापन लोक सहभागातुन व्हावे या उद्देशाने १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एक दिवसीय वन व कृषी पर्यटन अभ्यास शिबीर आयोजित केले आहे. ताडाळा मार्गावरील हरीकृपा कृषी फार्म मूल येथे आयोजित शिबीराला वन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक विवेक मोरे, सावली येथील वनपरीक्षेञ अधिकारी वसंत कामडी, सामाजिक वनिकरण विभागाचे डि.आर.आडकिने आणि मूल येथील क्षेञ सहायक प्रशांत खनके उपस्थित राहणार आहेत. शिबीराचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक हरीभाऊ तेलंग आणि विरेंद्र मेश्राम यांनी केले आहे.