JEE (Main) परीक्षा आॅनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढ 23 जानेवारी

34

 

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून 23 जानेवारी २०२१ पर्यंत मुदत वाढ

वर्षातून चार वेळा जेईई—मेंन्स परीक्षा

 

देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी JEE (Main) 2021 ही परीक्षा यावर्षीपासून इंग्रजी, हिंदी व मराठीसह इतर दहा प्रादेशिक भाषेमध्ये घेतली जाणार आहे. तसेच यंदापासूनच ही परीक्षा चार सत्रात घेण्यात येणार आहे.यासंदर्भात नॅशनल टेस्टांग एजन्सीच्या (एनटीए) वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पाराशर यांनी नुकतेच परिपत्रक काढले आहे. पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत परीक्षा होणार असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आपआपल्या मातृभाषेत प्रश्नपत्रिका सोडवणे सोयीस्कर ठरणार आहे.

प्रादेशिक भाषेत परीक्षा घेण्याचा हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतला आहे. जेईई (मेन) परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजीसह आसामी, बंगाली, कानडी, मल्याळम, गुजराती, उडीसी, पंजाबी, तमिळ, तेलगु व उर्दु या प्रादेशिक भाषेतून घेतली जाणार आहे. तसेच यंदापासूनच जेईई (मेन) परीक्षा एकूण चार सत्रात घेतली जाणार आहे. या परीक्षा फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या महिन्यात होणार आहे. सदरील परीक्षा 23, 24, 25, 26 फेब्रुवारी, 15, 16, 17, 18 मार्च, 27, 28, 29, 30 एप्रिल आणि 24, 25, 26, 27,२८ मे या तारखांना देशातील विविध केंद्रांवर घेतले जाणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

बहुपर्यायी, बहुसत्रीय परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून, त्यांना गुण सुधारण्यास मदतही होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसानही होणार नाही. कोविड-19 मुळे किंवा बोर्ड परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेचा महिना निवडता येणार आहे. विद्यार्थ्याना चार परीक्षा देणे बंधनकारक नाही, दिल्यास त्यापैकी एका परीक्षेतील मिळवलेले सर्वाधिक गुण विचारात घेवून गुणवत्ता यादी तयार केली जाईल, असेही डॉ. साधना पाराशर यांनी परिपत्रकात म्हटले आहे. सदरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 90 प्रश्न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांना कोणतेही 75 प्रश्न सोडवण्याची मुभा राहील. प्रश्नपत्रिकेच्या भाग- ब (संख्यात्मक) मध्ये विद्यार्थ्यांना पर्याय दिले जातील व त्यासाठी कोणतेही नकारात्मक गुण असणार नाहीत.