अविरोध निवडुन आलेल्या 15 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

32

मूल :— तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अविरोध निवडुन आलेल्या 15 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यावर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत होते,प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राकेश रत्नावार,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष येनूरकर,महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार,आदर्श सोयायटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे,नगरसेवक विनोद कामडी,ललिता फुलझेले,किसान सेलचे तालुकाध्यक्ष रूमदेव गोहणे उपस्थित होते.

राजगड आणि उधळपेठ या ग्रामपंचायत मधील सदस्य हे अविरोध निवडूण आले आहेत,तालुक्यातीलइतर ही ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेस पक्षाचे 15 सदस्य अविरोध निवडूण आले आहेत. त्या सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.