चिरोली परिसरात वाघाचा धुमाकूळ वाघाचा बंदोबस्त करावा : पं.स.सदस्य वर्षा लोनबले

58

चिरोली परिसरात वाघाचा धुमाकूळ
वाघाचा बंदोबस्त करावा : पं.स.सदस्य वर्षा लोनबले
मूल :— चिरोली ते टोलेवाही परिसरातील शेती शिवरात गेल्या पंधरा दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातला असून अनेक शेतक—यांचे जनावरे गाई—म्हशी मारले तर अनेक जनावरे जखमी सुध्दा केले आहे. यामुळे चिरोली व टोलेवाही परीसरातील शेतशिवरात जाणा—या नागरिकांना देखील भीतीचे वातावरण पसरले असून शेतात तुरी,लाख,सांभार असे रब्बी पीक पेरले असून सुध्दा शेतकरी शेतात वाघाच्या भीतीपोटी जाऊ शकत नाही.
वन विभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मुल पंचायत समितीच्या चिचाळा—केळझर क्षेत्राच्या सदस्या वर्षा लोनबले यांनी केले आहे.
चिरोली येथील प्रभाकर त्रीनागरीवर यांची 1 गाय,1 म्हैस,जखमी केली आहे.
पुणेश्वर निकुरे यांचा 1 बैल 1 गाय मारली, टोलेवाही येथील सुनील बोकुलवार यांचे 3 गुरे जखमी केले आहे. तर दिलीप म्याकलवार याच्या 2 गुरांना ठार केले आहे.
एवढी दहशत वाघाने चिरोली शेतशिवरात पसरविली असून या दहशतीमूळे माणसे देखील भयभीत झाले आहेत. तरी वनविभागाने या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा.अशी मागणी पं.स.सदस्या वर्षा लोनबले यांनी केले आहे.