मूल नगर परिषदेने उचलला स्वच्छतेचा विडा

43

मूल नगर परिषदेने उचलला स्वच्छतेचा विडा
मूल :— नगर परिषदेने शहर स्वच्छता अभियानाचा विडा उचलला आहे.नगर परिषद मूलचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे,मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या पुढाकाराने बसस्थानकाजवळील तलावाजवळ जमा झालेला कचरा व इतर टाकाऊ पदार्थ संकलित करण्यात आले.
मूल शहर,स्वच्छ शहर ही संकल्पना साकारण्यासाठी मूल नगर परिषदेने स्वच्छता अभियानाला सुरूवात केली आहे. शहराची ओळख ही स्वच्छतेवर अवलंबून असते. प्रथम दर्शनी येणा—याला रस्ते,नाल्या स्वच्छ दिसल्या तर समाधान व्यक्त केले जाते. जागोजागी साचलेला कचरा,सर्वत्र घाणीचे साम्राज्य ,उग्र वास,सार्वजनिक शौचलयाची दुरावस्था यामुळे विविध आजाराचा सामना करावा लागतो. आजाराला रोखण्यासाठी स्वच्छता राखणे ही काळाजी गरज आहे. यासाठी नगर परिषदेने स्वच्छतेचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. आपल्या घरासमोरील परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.फक्त नाम मात्र स्वच्छतेचा देखावा न करता, सर्व पदाधिकारी,नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे.