महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनात्मक अनुदानाचा शासन मुर्हूत कधी ? शेतकरी संतप्त : नियिमत कर्ज भरणारे वंचित

59

मूल (प्रमोद मशाखेत्री) :— महाराष्ट्र शासनाने नियमित कर्ज भरणा—या शेतक—यांना 50 हजार रूपये
प्रोत्याहनात्मक अनुदान जून अखेर कर्ज भरल्यास देण्याची घोषणा केली होती.आता जवळपास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनसुध्दा अद्याप शासनाकडून शेतक—यांबाबत निर्णय घेतलेला नाही.हा प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा शासन मुहूर्त कधी काढणार? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतक—यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहीर केली होती. या योजनेत दोन लाख रूपयांच्या आतील थकबाकीदार शेतक—यांना पात्र धरले. परंतु या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणा—या शेतक—यांचा विचार केला नव्हता. कर्ज भरणा—या शेतक—यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शेतक—यांनी त्यांच्या नावावरील कर्ज 30 जून अखेर भरावे म्हणजेच हे अनुदान देता येईल,असे सांगितले होते. शेतक—यांनी हे कर्ज भरून आता पाच ते सहा महिन्यांचा अधिक कालावधी उलटला आहे.
मात्र,शासनाकडून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतक—यांच्या खात्यावर वर्ग करून शेतक—यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतक—यांनी केली आहे. याकडे सबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.