नामांकन अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस

46

नामांकन अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस

मूल :— तालुक्यातील 49 पैकी 37 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण 811 नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी येरगांव आणि केळझर येथील प्रत्येकी एक,हळदी येथील दोन आणि येरगांव येथील तीन नामांकन अर्ज छाननीमध्ये अवैद्य ठरले. त्यामुळे सध्यास्थितीत 804 नामांकन अर्ज कायम आहेत.आज 4 जानेवारीला नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठया प्रमाणात नामांकन अर्ज परत घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणा—या राजोली ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सर्वाधिक 40 नामांकन दाखल झाले. त्या खालोखाल चिचाळाकरिता 39 आणि नांदगावसाठी 38 नामंाकन अर्ज दाखल झाले. आदर्श ग्राम म्हणून सर्वदुर परीचित असलेल्या राजगड ग्रामपंचायतीकरीता केवळ 9 आणि भवराळा ग्रामपंचायतीसाठी 12 अर्ज दाखल झाले. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे म्हणून प्रमूख राजकीय पक्षाचे नेते अविरोध निवड झाल्यास पुरस्कार मिळेल या प्रलोभनासह अनेक आमिष दाखवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यामूळे 37 ग्रामपंचायतीच्या अनेक वार्डात अविरोध निवड होणार असून ज्या वार्डात निवडणूक होणार आहे त्या वार्डात चुरशीचे सामने रंगणार आहे. भाजपाविरूध्द महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीच्या रंगणाया सामान्यात बाजी कोण मारेल,हे सध्यातरी गुलदस्तात आहे.
पण रंगतदार होणारी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तालुका प्रशासनही सज्ज झाले आहे. तालुक्यात 37 ग्रामपंचायतीसाठी एकुण 118 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असून मतदान केंद्रावरील 472 आणि राखीव 25 अश्या जवळपास 500 कर्मचा—यांना प्रशिक्षित केले जात आहे.