जिजाऊ ब्रिगेड व राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिलां बचतगटातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फोटोला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

46

मूल :— जिजाऊ ब्रिगेड व राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिलां बचतगटातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फोटोला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई नी त्या काळात स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा केला नसता तर तुम्ही आम्ही ही शिकू शकलो नसतो, या शिक्षणाचा उपयोग आपले जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी करावा असे आवाहन नगराध्यक्ष रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी केले.       जिजाऊ ब्रिगेड तथा राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिलां बचत गटाच्या अध्यक्षा संजीवनी वाघरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला ,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधना रडके,अर्चना चावरे,वर्षा मोडक,अनिता कुडे,उषा नागापूरे,अम्रूता झरकर,रंजना लाडवे यांनी प्रयत्न केले. संचालन सुषमा धोटे यांनी केले.