आधार ‘पीव्हीसी कार्ड’ काय आहे? घरबसल्या कसं मिळवाल? जाणून घ्या…

67

नवी दिल्ली
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरू केलं आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड बाजारात आणलं.

आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे. त्यामुळे ते तुम्ही पाकिटात सहजपणे ठेवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

पीव्हीसी आधार कार्डचे फायदे
>> पीव्हीसी कार्डची गुणवत्ता चांगली असल्यानं ते दीर्घकाळ टीकेल आणि पाकिटातही सहजपणे ठेवता येतं.
>> पीव्हीसी कार्डमध्ये लॅमिनेशन केलं जात असल्यानं छापील माहिती देखील सुरक्षित राहते.
>> आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात.
>> पीव्हीसी आधार कार्डद्वारे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाइन व्हेरिफिकेशन करता येतं.

कसं कराल ऑनलाइन अप्लाय?:
१. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

२. ‘My Aadhaar Section’ मध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ या पर्यायावर क्लिक करा

३. त्यानंतर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्यूअल आयडी क्रमांकाची नोंद करा.

४. सिक्यूरिटी चेकसाठी समोर दाखविण्यात येणारा ‘कॅप्चा कोड’ अचूक नोंदवा

५. त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा

६. आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP मिळेल.

७. OTP क्रमांक नोंदवा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

८. तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर “My Mobile number is not registered” या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यामध्ये तुमचा नोंदणीकृत नसलेला मोबाइल क्रमांक नोंदवा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

९. आता तुम्हाला पीव्हीसी कार्डची प्रीव्हू कॉपी दिसेल.

१०. आता पेमेंट पर्यायावर क्लिक करुन ५० रुपयांचे शुल्क नेटबँकिंग किंवा यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून भरू शकता.

११. शुल्क भरल्याचा मेसेज आल्यानंतर तुमचे आधार पीव्हीसी कार्ड देखील ऑर्डर केले जाईल.