पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

40
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा
चंद्रपूर, दि. 2 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह वरोरा नाका, चंद्रपुर येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 12.30 वा. हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर, येथे आगमन व राखीव. दु. 2 वा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिन समारोह-2021 या कार्यक्रमास जोडे देऊळ देवस्थान सभागृह पठाणपुर येथे उपस्थिती. सायं. 4 वा. चंद्रपुर येथून नागपूर कडे प्रयाण.