कन्नमवार सभागृह मुल येथे सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन कार्यक्रम

36
मूल :–   क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्य महिला शिक्षण दिन कार्यक्रमाचे आयोजन कन्नमवार सभागृह मुल येथे दिनांक ३ जानेवारीला दुपारी 2-00 वाजता  आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प अध्यक्ष संध्याताई गुरनुले,मार्गदर्शक शशिकला गावतुरे,कार्यधक्ष समता परिषद,. मीराताई शेंडे,निवृत्त मुख्यध्यपिक,सीमाताई लोनबले, रत्ना चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या,.सुषमा नागोशे,, यांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे,माजी उपाध्यक्ष रत्नमाला ठाकरे, न.प.सदस्य शांताबाई मांदाळे, बाजार समिती संचालिका बहिणाबाई वाढई,माजी न.प.सदश वर्षा लोनबले यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले समता परिषद,माळी महासंघ,डॉ. यशवंत युवा मंच, क्रांती ज्योती सहकारी पथसंथा, महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्था,सावित्रीबाई महिला मंडळ,सर्व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिले असून असंख्य माळी समाज बंधू-भगिनी,युवक-युवती यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक व माळी समाजाच्या सर्व संघटनांनी केले आहे.