पोलीस स्टेशन मूल येथे 11 वाजता वाहनांच्या लिलाव

48

मुल (सचिन वाकडे) :-  सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद घेवून चोविस तास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सदैव ऑन डयुटी तप्तर असते. कर्तव्य बजावत असतांना पोलीस विभागाकडून विविध गुन्हयातील आरोपींना वाहनांसह अटक केल्या जाते. तसेच विविध छापेसत्रात वाहन जप्ती केल्या जाते. मुल पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या वाहनांच्या लिलाव शनिवार 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सतिशसिंह राजपुत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
मुल येथिल उप विभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे आदेशान्वये बेवारस वाहनांचे लिलाव करण्यात येत असून लिलावात कमांडर जीप, टाटा सुमो, पॅशन प्रो, होंडा सिडी 100, सुपर स्प्लेंडर, बजाज कावासाकी, स्कुटर अश्या 33 दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या लिलाव होत असून इच्छुकांनी लिलावाचे वेळी पोलीस स्टेशन मुल येथे हजर राहण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक सतिशसिंह राजपुत यांनी केले आहे.