महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मिळाली 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

59

मूल (प्रमोद मशाखेत्री) :— एकाच क्लिकवर शासनाच्या विविध योजनांची मा​हिती शेतक—यांना
मिळावी या हेतूने शासनाने महा​डीबीटी पोर्टल सुरू केले आहे. 31
डिसेंबर ही नोंदणीची अखेरची तारीख होती.पण आता शासनाने शेतकरी
हित जोपासत नोंदणीसाठी 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

महा​डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतक—यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,कृषी
यांत्रिकीकरण,उपअभियान,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान,बिरसा मुंडा,कृषी क्रांती
योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियान,कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम ,भाऊसाहेब फुंडकर फळबाग
लागवड योजना,राष्ट्रीय कृषी विकास योजना,राज्य कृषी यांत्रिकीकरण
योजना,मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्सासाठी आॅनलाईन
पध्दतीने अर्ज करता येतो.

आयकर भरणारे शेतकरीही करू शकतात नोदंणी :— महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अतिशय सोपे असून, नोंदणी करताना केवळ आधारकार्ड,सातबारा आणि आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. आयकर भरणारे शेतकरीही महाडीबीटीवर नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकत असल्याचे सांगण्यात आले.