दरमहा 42 रूपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा केंन्द्र सरकारची योजना

46

दरमहा 42 रूपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा केंन्द्र सरकारची योजना
मूल (प्रमोद मशाखेत्री ):— केंद्र सरकारने अटल पेन्शन नावाने योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार 1ते 5 हजार रूपयांपर्यंत पेन्शन देते. 18ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजना खाते उघडू शकते.यामध्ये आपण जितत्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा जास्त फंड मिळतो. या योजनेअंतर्गत मुत्यूनंतरही तुमच्या कुटुंबाला मदत मिळते. तुम्ही केवळ 42 रूपयांपासून गुंतवणुकीस सुरूवात करू शकता. यानुसार वयाच्या 60 व्या वर्षापासून तुम्हाला 1 हजार रूपये पेन्शन मिळते. आता यामध्ये दरमहा 210 रूपये जमा केले,तर पेन्शन प्रति महिना 5 हजार मिळणार आहे.
जर वयाची 60 वर्ष पुर्ण होण्याआधीच लाभाथ्र्याचा मृत्यू झाला. तर ही रक्कम त्या व्यक्तीचा पार्टनर म्हणजे पती किंवा पत्नीला दिली जाते. तर दोघांचाही मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला दिली जाते.
या योजनेचा आॅक्टोबर 2020 पर्यंत 2.45 केाटीवर लोक फायदा घेत आहेत. कोणत्याही सरकारी किंवा खासगी बॅंकेत किंवा बॅंकेत किंवा पोस्ट आॅफीस मध्ये या योजनेसाठी खाते उघडला येईल. तर एका व्यक्तीला एकच अटल पेंन्शन योजना खाते उघडण्याची मुूभा आहे. विशेष म्हणजे,इनकम टॅक्स कायदा सेक्शन 80 उ अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूटदेखील मिळते. अटल पेंशन योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपण जवळच्या बॅंक शाखेतसुध्दा भेट देऊ शकता.