निराधार योजना,वृध्द,दिव्यांग,निराधार,श्रावणबाळ,संजय गांधी मासिक वेतन आॅनलाईन अर्ज

30

 

मूल (प्रमोद मशाखेत्री )    :— समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणा—या ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,विधवा,परित्यक्त्या,अनाथ,दुर्धर आजाराने                                                ग्रस्त व निराधारांसाठी महसूल विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसाहायत्ता विविध योजनांच्या                                                    लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुका स्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची असते.

वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना तसेच विधवा,परित्यक्त्या,अनाथ ​आणि दुूर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना सुरू आहे. निवड झालेल्या लाभाथ्र्यांना एक हजार रूपये प्रतिमहिना अर्थसाहाय त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले जाते. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील कत्या पुरूषाचा मृत्यू झालेल्यांसाठी राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मृतक कुटुंबीयांच्या वारस कुटुंबास वीस हजार रूपये अर्थसाहय दिले जाते.

महसूलच्या अखत्यारितील संजय गांधी स्वावलंबन योजना या विभागाकडून चालवली जाते. या योजनेच्या लाभाथ्र्याची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते. या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता व पदसिध्द सचिव म्हणून तहसीलदार असतात.

लाभार्थीना संजय गांधी निराधार योजना साठी लागणारे कागदपत्रे :—

1. प्रवर्गाचा दाखला — तलाठी,ग्रामसेवक यांचा दाखला
2. ओळखीचा पुरावा — मतदान कार्ड,आधार कार्ड
3. रहिवासी दाखला — रहिवासी दाखला
4. दारिद्रय रेषेखालील पुरावा
5. प्रवर्गाचा दाखला विधवा —मृत्यूदाखला
6. डॉक्टर मेडीकल प्रमाणपत्र
अपंग असेल सव्हील सर्जन चा प्रमाणपत्र
———————————————————————————————————————————————
श्रावण बाळ योजना साठी लागणारे कागदपत्रे
1. प्रवर्गाचा दाखला — तलाठी,ग्रामसेवक दाखला
2. उत्पन्न प्रमाणपत्र 21000 हजार —तहसीलदार साहेबांचा
किंवा दारीद्रय दाखला
3. वयाचा दाखला 4.डॉक्टर मेडीकल प्रमाणपत्र
5. प्रवर्गाचा दाखला — मृत्यूदाखला