झोपा काढो आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विनोद कामडी

30

झोपा काढो आंदोलन करण्याचा इशारा
नगरसेवक विनोद कामडी
मूल :— नगर परिषद ने तीन वर्षापूर्वी महात्मा फुले चौकाचे सौंदर्याीकरण व महात्मा गांधी यांच्या पुतळयाच्या चबुत—यांची उंची वाढवून सौंदर्यीकरण करणार,असा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र अमलबंजावणी करण्यात आली नाही. सुनिल गोगुलवार ते जगदंबा राईस मिलपर्यंत नाली,रमेश रामटेके ते सुरेश फुलझेले यांच्या घरापर्यंत रस्ताचे बांधकाम तसेच स्वामी विवेकानंद विद्या मंदिर ते जगदंबा राईस मिलपर्यंत पथदिव्यांची दुरूस्ती करणे आदी समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधणे सुरूच आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष हेात आहे. ही समस्या महिन्याभरात सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विनोद कामडी यांनी दिला आहे.
नगर परिषद अंतर्गत विविध समस्याची पुर्तता व्हावी,यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या महिन्याभरात झाली नाही तर प्रशासनाच्या विरोधात झोपा काढो आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विनोद कामडी यांनी मुख्याधिका—यांकडे निवेदनातून केला आहे.