मूलचे क्रिडा संकुलास स्व.वि.तू.नागपूरे यांचे नांव देण्यात यावे. आम आदमी पार्टी मूलची मागणी

43

मूल प्रतिनिधी

स्व.वि.तू.नागपूरे हे चंद्रपूर जिहृयातील बहुजन समाजातील नामवंत व्यक्ती होते. ते बनारस विद्यापिठातुन कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पैशाचे मागे न धावता बहुजन समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांनी गांधीजींच्या सहवासात स्वातंत्र्याच्या लढ्यातही योगदान दिले. ग्रामिण भागातील बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ मूलची स्थापना करून मूल, राजोली, व्याहाड, अंतरगांव येथे शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली. त्यामुळे मूलच्या सामाजिक व राजकिय विकासात त्याचे मोठे योगदान आहे.
स्व.वि.तू.नागपुरेजी हे राज्य सभेचे खासदार होते. शासनाने त्यांचा दलित मित्र म्हणुन गौरव केला होता. त्यांच्या कार्याची माहिती निरंतर राहण्यासाठी त्यांचे नाव मूलचे क्रिडा संकुलास देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तसे निवेदनही मूलचे तालुका अध्यक्ष अमित राऊत यांचे नेतृत्वात उपविभागिय अधिकारी यांना देण्यात आले.

या मागणीला मूलचे प्रतिष्ठीत नागरीक सिनेट सदस्य सुनिल शेरकी, विजय नागपूरे, धनराज कुडे,विवेक मुत्यलवार,प्रशांत गटुवार, किसन वासाडे,अशोक झाडे,राकेश मोहुर्ले,मार्कंडी चावरे, अर्चाना चावरे,किरण चौधरी,सुजाता नागपुरे,रंजना नागपुरे,श्वेता शेरकी आदींनी या मागणीला
सम​र्थन देत निवेदन देतांना उपस्थित होते.