संगणकीय प्रक्रियेमधून अर्ज भरावे लागणार

64

संगणकीय प्रक्रियेमधून अर्ज भरावे लागणार
मूल (प्रमोद मशाखेत्री) : मुल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या दरम्यान भरावे लागणार आहे. 25 आणि 27 तारखेना सार्वजनिक सुटी येत असल्याने प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त चार दिवस मिळणार आहेत. उमेदवारांना संगणकीय पध्दतीनुसार उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहे. कोरोना संसर्गाची पाश्र्वभूमी लक्षात घेता फिजीकल डिस्टन्सिंगची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारीला होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न झाल्यामुळे कोणत्याच उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत नसले तरीही उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरावी लागणार आहेत.
त्यासाठी निवडणूक संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवाराने आॅनलाईन प्रक्रियेमधून अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून सबंधीत निवडणूक निर्णय अधिका—याकडे सादर करावे लागणार आहे.     उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक दाखले, स्वयं घोषणा पत्र व अन्य कागद पत्र जोडून अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाचा आहे.
सन १९९५ किंवा त्यानंतर जन्मलेला उमेदवार ७ वी उत्तीर्ण असला पाहिजे ही अट प्रथमच घालण्यात आली आहे, आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणूकीत शिक्षणाची अट कधीच घालण्यात आली नाही, यावेळी प्रथमच शिक्षणाची अट १९९५ किंवा नंतर जन्मलेल्या उमेदवारांसाठी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कोरोनाच्या संसर्गाची पाश्र्वभूमी लक्षात घेवून गर्दी टाळण्याचे दुष्टीने निवडणूक अधिकारी कक्षात उमेदवारी अर्ज छाननी आणि चिन्हे वाटप इत्यादी कामे फिजीकल डिस्टन्सिंग सांभाळून पार पाडणे असल्याने प्रत्येक उमेदवारांना वेगवेगळी वेळ देण्याची शक्यता आहे मात्र यावेळी प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बांधनकारक असणार आहे.