मुल शहर कधी होणार डुक्कर मुक्त ?

42

मूल (प्रमोद मशाखेत्री) शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून,कच—या  सभोवताल मोकाट जनावरे आणि डुकरांचा सतत मुक्तसंचार असतो. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून,हे शहर डुक्करमुक्त होणार कधी,असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.
सुंदर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणा—या मूल शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे.शहराच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा महिन्याकाठी लाख रूपयांचा खर्च होतो. असे असताना शहर  वासीयांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. शहराच्या दैनंदिन साफसफाईसाठी पालिकेने कर्मचा—यांची नियुक्ती केली असून,त्यांच्या वेतनावर लाख रूपये खर्च होतात.  बहुतांश भागात कचरा व घाणीचे ढिगोरे पसरले राहतात. यामुळे परिसरात डुकरे व मोकाट जनावरे फिरून घाण पसरवितात. त्यामुळे शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.