एल्गार अभ्यासिकेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा

36

एल्गार अभ्यासिकेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा
सचिन वाकडे
गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या जन्मदिन हा मुल येथील एल्गार अभ्यासिकेत ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश देशमुख तर मुख्य मार्गदर्शक म्हणून सुनिल शेरकी उपस्थित होते.           श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी चेन्नईपासून 400 किलोमीटर दूर इरोड या गावात झाला होता. त्यांचे प्रारंभीक शिक्षण कुम्भकोणमला झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यान त्यांच्या जी. एस. कार यांचे गणित विषयावरील पुस्तक वाचण्यात आले आणि तेव्हापासून गणित विषयात त्यांची आवड निर्माण झाली. ब्रिटनचे प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. हार्डी यांनी रामानुजन यांची प्रतिभा ओळखून त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश करवून दिला आणि तेथे त्या दोघांनी गणिताला नवे आयाम दिले .
श्रीनिवास रामानुजन यांनी 5000 हून अधिक प्रमेयांची ( थ्योरम ) निर्मिती केली, ज्यांना अनेक दशकानंतरही सोडवले गेले नाही. गणितातील विश्लेषण , संख्या सिद्धांत, इंफिनाइट सिरिज आणि सतत अपूर्णांक यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजम यांना श्रद्धांजली देत वर्ष 2012 ला ‘राष्ट्रीय गणित वर्ष’ म्हणून घोषित केले होते. सोबतच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जन्मतारीख 22 डिसेंबरला ‘राष्ट्रीय गणित दिवस’ देखील घोषित केले गेले.

मुख्य मार्गदर्शक सुनिल शेरकी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करून गणिताचे काही विशेष ट्रिक समजावून सांगितले. यावेळी एल्गार अभ्यासिकेचे विद्यार्थिनी काजल सुरपाम, मोनिका मडावी, चित्रा मडावी, सोनी गेडाम, प्रिया चौधरी, दामिनी भोयर, काजल चौखुंडे, प्रतीक्षा खोब्रागडे, वैष्णवी वाढई, काजल धारणे उपस्थित होते.