प्रशासकीय भवन परिसरात संविधान शिल्प उभारा – आपची मागणी

49

प्रशासकीय भवन परिसरात संविधान शिल्प उभारा – आपची मागणी

मूल  (सचिन वाकडे )

मुल येथील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालये असून ती सर्व कार्यालये संविधानानुसार कार्य करीत आहेत. तालुक्यातील मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सोहळा हा प्रशासकीय भवन परिसरात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. या परिसरात संविधान शिल्प उभारून त्याचे संवर्धन तसेच जतन करण्याची जबाबदारी प्रशासकीय भवनाने घेण्याची मागणी आम आदमी पार्टी मुल कडून उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आलेली आहे.
भारताचे संविधान हे संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ ला स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. तेव्हापासून दरवर्षी२६ जानेवारी रोजी पाळला जाणारा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रिय दिन आहे.
या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत गाऊन आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा, महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन भाषणाचे आयोजन केले जाते.
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढयाचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर आधारित होते.
संविधान समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधानसंपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. दरवर्षी भारतीय संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असतो.
यावेळी गौरव शामकुळे, अमित राऊत, सचिन वाकडे, कुमुदिनी भोयर, संजना चिताडे, पियुष रामटेके, पंकज गेडाम, उत्तम आडे, विनोद मडावी, अक्षय गेडाम उपस्थीत होते.