मूल तहसीलचा सेतू हाऊसफुल

58

मूल :— शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्याथ्र्याची सेतू,आपले सरकार व महाईसेवा केंन्द्रावर गर्दी होत आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्या—या विद्याथ्र्याची संख्या मोठी आहे तसेच ग्रामपंचायत निवडणूका कार्यक्रम जवळ आल्याने त्यांना पण महसूल पुरावा लागत असल्यामुळे गर्दी दिसून आली.
प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्यास विद्याथ्र्यांचा प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याआधीच आवश्यक ती कागदपत्रे काढण्यासाठी पालक व विद्यार्थी प्राध्यान्य देत आहेत.

सरकारने विविध प्रकारचे दाखले विद्याथ्र्यांना निर्धारित वेळेत मिळावेत. यासाठी स्पष्ट सूचना सबंधीत यंत्रणाला दिल्या आहेत. नियमित शासकीय शुल्कापेक्षा जास्तीच्या रकमेची मागणी झाल्यास तसेच पालकांची अडवणूक अरेरावीपणा आदी प्रकार घडल्यास त्याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिका—यांन   कडे करता येणार आहे.
अनेक प्रमाणपत्रासाठी सात ते 15 दिवसांचा कालावधी दिला असतांना तो प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नसल्याने पालक तथा विद्यार्थी मेटाकुटीस आले आहेत. वरिष्ठ अधिका—यांनी दाखल घेण्याची गरज आहे.