खेळातील संघवृत्ती गावच्या विकासासाठी जोपासा – विजय सिद्धावार

37

जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी व्यक्त केले.

मूल तालुक्यातील नलेश्वर येथे जय भोले क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आज गावात एकोप्याचा अभाव दिसतो, त्यामुळे या मैदानावर उपस्थित झालेले युवक जर आपली संस्कृती कायम ठेवून गावच्या विकासातही त्याचा वापर केला तर गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असेही मत श्री सिद्धावार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रकाश चलाख, प्रशांत वाळके, भाऊराव गेडाम, रवींद्र गेडाम, सुरेश गेडाम, किर्तीवर्धन शेंडे प्रवीण वेलादी, गौतम गेडाम आदी उपस्थित होते.

दिनांक २० ते २० तारखेपर्यंत हे क्रिकेटचे सामने घेण्यात येणार आहे.