2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पदवीधारक हवे आहेत

44

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

BOB Recruitment 2020-21: पदांची संख्या
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत.

 

 

Bank Of Baroda Job Vacancy शैक्षणिक अट
BOB Recruitment 2020-21 नुसार सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तर फायर ऑफिसरसाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क
या पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 600 रुपये तर एससी/एसटीच्या उमेदवारांना 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.

How to Apply for BOB Recruitment: अर्ज कसा कराल?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट bankofbaroda.co.in वर जा…
  • होम पेजवर करिअर लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा…
  • Bank of Baroda Career Details पेजवर नोटिफिकेशन दिसेल..
  • त्यावर Link to Apply वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता.