शासकीय बांधकामाला रेतीचा पुरवठा परंतू प्रधानमंत्री आवास योजनातील लाभार्थी वाळू पासून वंचित

41

शासकीय बांधकामाला रेतीचा पुरवठा
परंतू प्रधानमंत्री आवास योजनातील लाभार्थी वाळू पासून वंचित
मूल (प्रमोद मशाखेत्री ):— शहरात विविध विकास कामे अंतर्गत रस्ते,नाल्या,बांधकाम,शासकीय विश्रामगृह मधील बांधकाम सुरू आहे बांधकामाकरिता मोठया प्रमाणात रेतीचा वापर करण्यात येत आहे. मूल तालुक्यातील,शहरातील एकही घट लिलाव नाही त्यामूळै या बांधकामाकरिता रेती कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे.
मूल शहरातील नगरपालीके अंतर्गत विविध रस्ताचे नाल्या,रोड,विश्रामगृहातील मोठ,मोठया बिल्डींग बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकरिता शेकडा ब्रास रेती लागत आहे.

ही रेती कुठून येते असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुल शहरातसह,तालुक्यासह चंद्रपूर जिल्हयात एकही रेती घाट लिलाव झाला नाही त्यामुळे रस्ता बांधकामाकरीता कुठून आणले जाते हा मुख्य प्रश्न निर्माण होत आहे.
जप्तीच्या रेतीचा वापर घरकुल साठी न मिळता शासकीय बांधकामाला मिळते काय , असा भ्रम घरकुल लाभाथ्र्यांना होत आहे.