स्वच्छता अभियान राबवून गाडगे बाबांना अभिवादन

51

स्वच्छता अभियान राबवून गाडगे बाबांना अभिवादन

थोर समाजसुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची ६४ वि पुण्यतिथी मुल येथील बालविकास शाळेजवळ चैतन्य मित्र परिवारच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी माल्यार्पण करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना, स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
यावेळी बंडू रोहणकर, रवी बरडे, सुनिल शेरकी, अनिल बुटे, संजय कामडे, अशोक नेरल, सुरेश जिल्हेवार, नामदेव गोहणे, रवींद्र फडतरे, किशोर कावडकर, भावना वरघंटे, सुनिता नेरल, स्वाती चौधरी, उपस्थित होते.