भजनातून गाडगे बाबांना अभिवादन

41

भजनातून गाडगे बाबांना अभिवादन

थोर समाजसुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची ६४ वि पुण्यतिथी मुल येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे वरटी धोबी समाजाच्यावतीने भजन गावून आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी माल्यार्पण करून भजनाला सुरुवात करण्यात आली.
गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना, स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
यावेळी उपस्थित बंडु रोहणकर, सुरेश ताजने, विजय तुंगीडवार, राकेश पुन्नावार, विजय कामनपल्लीवार, अर्चना पुन्हावार, पुष्पा केळझळकर, मनीषा येन्नरवार, संगीता पुन्हावार, मेघा दाम्पल्लीवार, लता केळझळकर उपस्थित होते.