पैशांच्या किती आणि कोणत्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड वापरलय ? घरबसल्या ‘असे’ शोधा , ‘ही’ आहे प्रोसेस

34

पैशांच्या किती आणि कोणत्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड वापरलय ? घरबसल्या ‘असे’ शोधा , ‘ही’ आहे प्रोसेस

आधार हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. मुलाच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडून आधारची मागणी केली जात आहे.

यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) द्वारे जारी केलेल्या आधार कार्डमध्ये यूजरची डेमोग्राफिक व बायोमेट्रिकची माहिती नोंदविली असते.

पैशांच्या व्यवहाराशी संबंधित कामांमध्येही आधार वापरला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमचा आधार आतापर्यंतच्या किती आणि कोणत्या पैशांच्या व्यवहारात वापरला गेला आहे तर तुम्हाला ते सहज कळेल.

यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर Aadhar Authentication History पर्यायाद्वारे आपण घरी बसून आपल्या आधार कार्डच्या शेवटच्या 6 महिन्यांचा इतिहास पाहू शकता. जाणून घ्या प्रोसेस :-

  • – सर्व प्रथम UIDAIची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर भेट द्या
  • – माय आधारच्या पर्यायावर क्लिक करा
  • – आता आधार सेवा विभाग उघडेल, ज्यामध्ये Aadhar Authentication History पर्यायावर क्लिक करा – आपला आधार नंबर आणि दिलेली कॅप्चा प्रतिमा भरा
  • – आपल्या मोबाइल नंबरवर संदेश म्हणून ओटीपी पाठविला जाईल
  • – ओटीपी भरल्यानंतर आपल्यासमोर 2 पर्याय येतील.
  • – ज्यामध्ये ‘ऑथेंटिकेशन टाइप’ ज्यात बायोमेट्रिक, डेमोग्राफिक इत्यादी माहिती मिळू शकेल .
  • – दुसरा पर्याय ‘Data range’ चा असेल. या पर्यायांतर्गत, एका तारखेपासून दुसर्‍या तारखेपर्यंत माहिती उपलब्ध असेल, ज्या वेळेची हवी असेल त्या वेळेची सर्व माहिती मिळू शकेल.
  • – सबमिट बटण दाबून आधार कार्डच्या वापराशी संबंधित सर्व माहिती मिळवा