ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आता 20 डिसेंबरपर्यंत

43
चंद्रपूर,दि. 16 डिसेबर : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने 12 व 13 डिसेबर,2020 रोजी पंडीत दीनदययाल उपाध्याय ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला उद्योजक व उमेदवारांचा प्रतिसाद लक्षात घेता आता 20 डिसेबर 2020 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ईच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:ची नांव नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नांवनोंदणी केलेली असेल असे सर्व उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग इन करुन 20 डिसेबर,2020 रोजी पर्यत वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा.
तसेच उद्योजकांसोबत व्हाट्सअप,गुगल मिट व्हिडीओ कॉलींग ईत्यादी च्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.