मोठी बातमी! गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा ठप्प

44

मुंबई
इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

‘जीमेल’वर ‘५०० एरर’
गेल्या अर्ध्यातासापासून जीमेवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करताना Temporary Error (500) असा मेसेज दाखवत आहेयामुळे जीमेलचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.