महाराष्ट्र ई सेवा अॅप

62
महाराष्ट्र ई सेवा अॅपद्वारे शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली जाते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे डिजीटायझेशन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाराष्ट्र ई सेवा अॅप कार्यरत आहे. राज्यातील विविध शासकीय विभाग आणि नागरिकांना सुलभपणे सेवा उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र ई सेवाचा उद्देश आहे.
गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/25axlR
महाराष्ट्र ई सेवा अॅपद्वारे खालील सर्व कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती प्रकाशित केली जाते.
1. शिधापत्रिका / रेशनकार्ड – नवीन शिधापत्रिकेसाठी, शिधापत्रिका नूतनीकरणासाठी, शिधापत्रिकेत नावाचा समावेश/नाव वगळण्यासाठी अर्ज, शिधापत्रिकेच्या प्रतिलिपीसाठी अर्ज, विभक्त पुरवठापत्रिका
2. वैयक्तिक सेवा – वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास दाखला, महिलांसाठी 50% आरक्षण, ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी अर्ज
3. प्रमाणित प्रत – जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख, स्वाक्षरीसह प्रमाणित
4. व्यावसायिक – हॉटेल, लॉज, उपहार गृह परवाना नूतनीकरण, हॉटेल परवान्यासाठी अर्ज, लॉजींग बोर्डींग परवाना, केबल ऑपरेटर अनुज्ञप्ती, उपाहारगृह अनुज्ञप्ती
5. कृषी – शेतकरी प्रमाणपत्र, भूमीहीन शेतकरी, बिगर कृषिक असल्याचे प्रमाणपत्रासाठी अर्ज
6. आधारकार्ड – आधार कार्ड लिस्ट, आधार पार्श्वभूमी आणि फायदे
7. कामगार विभाग – कारखाना नोंदणी, कारखाना नूतनीकरण, दुकाने व संस्था नोंदणीचा दाखला, दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला, कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी प्रमाणपत्र, इमारत आणि इतर बांधकाम मजूर आस्थापनांची नोंदणी, कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती, प्रमाणपत्राची नक्कल करणे, बिडी आणि सिगार औद्योगिक वस्तुंची नोंदणी, मोटार परिवहन कामगार नोंदणी
8. उच्च व तंत्रशिक्षण विभाग – दुय्यम गुणपत्रिका, दुय्यम पदवी प्रमाणपत्र, दस्तऐवज पडताळणी, मायग्रेशन प्रमाणपत्र, ट्रान्सस्क्रीप्ट प्रमाणपत्र
9. गृह विभाग – महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड – जलयानाची नोंदणी, नवीन प्रवासी वाहतूक अनूज्ञाप्ती व नूतनीकरण, बंदर हद्दितील छायाचित्रीकरण करण्यासाठी परवाना
10. ग्रामविकास व पंचायतराज विभाग – रहिवासी दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी दाखला, निराधार असल्याचा दाखला, हयातीचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, विभक्त कुटुंब प्रमाणपत्र, परितक्त्या प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र / जन्म दाखला
11. जलसंपदा विभाग – ’ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळे यांना घरगुती पाणी वापर परवाना’, ‘महानगरपालिका, खाजगी विकसक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/औद्योगिक पाणी वापर परवाना’, उपसा सिंचन परवानगी, नदी, जलाशयापासून अंतराचा दाखला देणे
12. परिवहन विभाग – वाहन हस्तांतरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, भाडे खरेदी, दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे
13. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा – भूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र, वाळू उत्खनन सर्वेक्षण, विंधन विहिर सर्वेक्षण
14. महसूल विभाग – उत्पन्न प्रमाणपत्र, ऐपतीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, डोंगरदुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, अल्प भु-धारक दाखला, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे, भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, स्थानिक केबलचालक केबल द्वारे प्रसारण करण्याकरिता परवाना मिळणेबाबत अर्ज, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र
15. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग DMER – DMER ना देय प्रमाणपत्र, अभ्यास प्रमाणपत्र देणे, कार्यमुक्त प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, नवप्रविष्टांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे.
16. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, आयुष – आयुष अभ्यास प्रमाणपत्र, आयुष चारित्र्य, आयुष ना देय प्रमाणपत्र
17. शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय – भाग २ राजपत्र जाहिरात नावात बदल, धर्मात बदल, जन्मतारखेत बदल
18. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग – सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानवी अभिहस्तांतरण, सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्ती करणे, सहकारी संस्थांची नोंदणी करणे
19. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – अपंगाना ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
20. महा ई सेवा – सर्व महाराष्ट्रातील महा ई सेवा केंद्रांचे नाव, पत्ता, संपर्क नंबर, ई-मेल आयडी
+6
208
8 comments
92 shares
Like

Comment
Share