PAN-Aadhaar लिंक करायचंय? जाणून घ्या सोपी पद्धत 31 मार्च 2021 पर्यंत पॅन-आधार लिंक करण्यास वेळ

35

नवी दिल्ली – मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत पॅन-आधार लिंक करण्यास वेळ देण्यात आला आहे.

लिंक केलेले नसल्यास पॅन कार्ड अवैध होईल –
पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. हे न केल्यास पॅनकार्ड अवैध केले जाईल. पॅनकार्ड रद्द केल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणजे, पॅन असूनही जेथे पॅन आवश्‍यक असेल तेथे आपण त्याचा वापर करू शकणार नाही. सीबीडीटीने म्हटले आहे की, जे टॅक्‍स रिटर्न भरत आहेत त्यांना पॅनकार्ड आधारशी जोडणे बंधनकारक आहे.

अशा प्रकारे पॅन-आधार लिंक करा –

* सर्वप्रथम आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत साइटवर जा. त्यानंतर लिंक आधारवर क्‍लिक करा.

* नंतर वर क्‍लिक करा. त्यानंतर खालील बॉक्‍समध्ये पॅन, आधार क्रमांक, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

* सर्व माहिती भरल्यानंतर लिंक आधारवर क्‍लिक करा.

* नाव आणि नंबर व्यवस्थित भरावेत.

याशिवाय पॅन सेंटरवर जाऊनही पॅनकार्डला आधारशी जोडले जाऊ शकते.