मुल बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या.! उलगुलान संघटनेची मागणी

42

मुल :-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मुल शहरात कोणतेही चौक नाही किंवा स्मारक नाही ही मूल शहरासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे. राजे शिवछत्रपती हे महान राजे होते. ते सर्व भारतीयांचे आराध्य दैवत आहेत व प्रत्येक नागरिकांच्या हृदयात शिवछत्रपती आहेत. राजे शिवछत्रपती यांच्या नावाचा सन्मान व्हावा ‌करिता मुल शहरातील नव्याने बांधकाम झालेल्या बसस्थानकाला “छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक मुल” असे नाव देऊन मूल शहराचा व मूल बसस्थानकाचा सन्मान वाढवावा करिता उलगुलान संघटनेच्यावतीने तहसीलदार मूल यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.
वरील मागणी प्रशासकीय स्तरावरून तात्काळ मान्य करून लवकरात लवकर “छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक मुल” असे नाव देण्यात यावे करिताचे निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, सुजित खोब्रागडे, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, हर्षल भुरसे, रितेश कामडी,वतण चिकाटे , साहिल खोब्रागडे, रितिक शेंडे, साहिल मेश्राम, चेतन दहिवले, कृणाल चिकाटे, करण डोर्लीकर, प्रथम गेडाम, सुमेध खोब्रागडे, सौरभ वायडे, अक्षय नमुलवार, अक्षय दुम्मावार,रितिक चोखआंद्रे, रुपेश मेश्राम, सुरज गेडाम, प्रफुल वाकडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.