लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेने मोठे अनर्थ टळले

34
मुल
मुल तालुक्यातील करवन (कोटा) या गावानजीक लागून असलेल्या जंगलामध्ये सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावातील अकरा महिला गेले असता झुडपात दबा धरून बसलेला पतट्टेदार वाघ अचानकपणे समोर आला. त्यामुळे भयभीत होवून महिलांनी जिवाच्या आकांताने सैरभर पळून जवळचं दिसणार्‍या वनविभाच्या मचानीचा आधार घेतला. परंतु माणसाळळेल्या वाघाने महिलांचा पाठलाग करून जवळजवळ दोन तास मचानीखाली मोठ्या-मोठ्या डरकाळी फोडत घालवले.
त्यावेळी त्या महिलांतील करवनच्या सौ. कन्नाके यांनी जवळचा मोबाईल काढून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांना संपर्क केला. सदरहू फोनचे संभाषन कानी पडताच सौ. संध्या गुरनुले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुलच्या उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर यांना तात्काळ घटनास्थळ गाठून त्या अकरा महिलांच्या मदतीसाठी तत्क्षणी मनुष्यबळ पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
घटनेची माहिती होताचं संबधित प्रशासनासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून महिलांवर चालून आलेल्या त्या वाघाला पळवून लावले.
आणि जवळजवळ दोन तास डरकाळीने भयकंपीत झालेल्या त्या महिलांचा जीव भांड्यात पडला.
या संपूर्ण घटनाक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सौ. संध्या गुरनुले यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन त्या महीलांची भेट घेतली. आणि लवकरात लवकर गावपरिसरातील वाघाचे बंदोबस्त करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी याठिकाणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत समवेत, मुल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, नगरसेवक प्रशांत समर्थ, करवनच्या सरपंचा, पो. पा. मोहन कन्नाके, वनरक्षक बंडू परचाके यांसह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.