नुकसान ग्रस्त शेतक—यांना शासनाने मदत करावी. मावा तुडतुडा रोगाने कहर केल्याने पिकाच्या उत्पन्नावर घट

31

मूल :— तालुक्यातील परिसरात तुडतुडा रोगाच्या प्रभावाने हातात आलेले पीक नेस्तनाबूत झाल्याने परिसरातील अनेक शेतक—यांच्या उत्पादनात लक्षणीय घट दिसून येत असून यावर्षी उत्पादनात सरासरी उतारा कमी येत असल्याचे परिसरातील चित्र आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. निसर्गानेही शेवटपर्यंत शेतक—यांना साथ दिली. हवामान समाधानकारक होते. पिकाची वाढ जोमदार होते. पीक तजेलदार होते.परंतु हंगामाच्या अंतिम टप्यात मावा तुडतुडा रोगाने कहर केल्याने हातचे पाीक नेस्तनाबूत होऊन याचा थेट परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला.
सध्या या परिसरात धान उत्पादक शेतकरी यंत्राच्या सहायाने मळणी करीत असून शिवरायांच्या कामात व्यस्त आहे.
परिसरातील मारोडा,चिरोली,चिचाळा, चांदापूर शेत शिवरात मशिनच्या सहायाने मळणी सुरू केली आहे. ऐन हंगामाच्या अंतिम टप्पयात मावा तुडतुडा रोगाचा कहर झाला. शेतक—यांनी फवारणी करून रोगाला नियंत्रणात ठेवण्याचे केले. परंतु निसार्गपुढे बळीराजा हतबल ठरला.फवारणीचा कसलाही परिणाम झाला नाही. त्यामुळे अनेक शेतक—यांचे हाताचे पीक नेस्तनाबूत झाले. याचा थेट परिणाम उत्पादनाच्या सरासरीवर झाला असून अनेक शेतक—यांना याचा फटका बसला आहे.
शेतकरी संकटात
मावा,तुडतुडा रोगाच्या कहराने माझे हाताचे पीक उदवस्त झाले.एक एकरात पाच पोते उत्पन्न झाले. खर्च 15,000 रूपये आला. नुकसान ग्रस्त शेतक—यांना शासनाने मदत करावी.
—विजय वैरागडे शेतकरी चिचाळा